महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टीला गुजरात राज्य व मुंबई च्या सिमेवर पालघर हा जिल्हा वसलेला आहे.पालघर जिल्हा बंदरपट्टी, जंगलपट्टी व शहरी भाग अशा तीन भागात विभागला गेला आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आली. त्यात आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. पालघर, डहाणू, वसई, तलासरी, वाडा, विक्रमगड, मोखाडा व जव्हार या तालुक्यांच्या मिळून पालघर जिल्ह्याची निर्मित करण्यात आली. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी 37.39% लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची (आदिवासी) आहे.
राज्य शासनाने आदिवासींसाठी एक स्वतंत्र जनजाती क्षेत्र उपयोजना १९७५-७६ मध्ये तयार केली त्यानुसार शासन निर्णय क्रमांक :- टी.एस.पी -१०७३/१८१५/डी.एस.आर.व्ही./दि.०१/०४/१९७७ नुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू या कार्यालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: १०८९/प्र.क्र.७९९/का-१५/दि.१५ जानेवारी १९९२ नुसार या कार्यालयाची पुर्नरचना करण्यात आली.
Read more..