महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टीला गुजरात राज्य व मुंबई च्या सिमेवर पालघर हा जिल्हा वसलेला आहे.पालघर जिल्हा बंदरपट्टी, जंगलपट्टी व शहरी भाग अशा तीन भागात विभागला गेला आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आली. त्यात आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. पालघर, डहाणू, वसई, तलासरी, वाडा, विक्रमगड, मोखाडा व जव्हार या तालुक्यांच्या मिळून पालघर जिल्ह्याची निर्मित करण्यात आली. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी 37.39% लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची (आदिवासी) आहे.
राज्य शासनाने आदिवासींसाठी एक स्वतंत्र जनजाती क्षेत्र उपयोजना १९७५-७६ मध्ये तयार केली त्यानुसार शासन निर्णय क्रमांक :- टी.एस.पी -१०७३/१८१५/डी.एस.आर.व्ही./दि.०१/०४/१९७७ नुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू या कार्यालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: १०८९/प्र.क्र.७९९/का-१५/दि.१५ जानेवारी १९९२ नुसार या कार्यालयाची पुर्नरचना करण्यात आली.
पालघर जिल्ह्यात डहाणू व जव्हार हे दोन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यरत आहेत. त्यात डहाणू प्रकल्पात डहाणू, पालघर, तलासरी व वसई ह्या तालुक्यांचा समावेश होतो. ह्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत शासकिय आश्रमशाळा 33, अनुदानित आश्रमशाळा 21, व 17 शासकिय वसतीगृहे कार्यरत आहेत. त्यात शासकिय आश्रमशाळेत १६,९६४ अनुदानित आश्रमशाळेत १३,१८९ व शासकिय वस्तिगृहात ४७६७ विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासी विध्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्रस्तरावरुन व राज्यस्तरावरुन विविध योजना राबवल्या जात अहेत. त्यात मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) योजनेद्वारे १५,९७६ विघ्यार्थांना दररोज सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, दुपारी ३:०० वाजता स्नॅक्स व संध्याकाळी ६:०० ते ७:०० च्या वेळेत जेवण असा पुरवठा केला जातो.
विध्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासाठी कराडी पथ,विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अमेय लाईफ व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आर्ट इंडिया,विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करिता बालसंसद,अश्या योजना राबविल्या जातात.
तसेच या कार्यालयाकडून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता विशेष केंद्रीय सहाय्य योजना, न्युक्लीअस बजेट योजना, नाविन्यपूर्ण योजना, ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, कन्यादान योजना, शबरी घरकुल योजना अश्या विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.
Thank You!
Your inquiry is received and we will contact you soon